LOKSANDESH NEWS
अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद
- वक्फ बाबत आमची भूमिका स्पष्ट आहे, भाजपने देशात हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला आहे, आणि विधयेक मुस्लिम समाजासाठी आहे सांगतात, विधयेक आडून वक्फ जमीन सरकारची घेण्याची इच्छा आहे. अरविंद सावंत गेले म्हणजे काय झाले, इतरांनी ऐकले भाजपने सांगितले का हे विधयेक हिंदूंसाठी आहे, मुस्लिमांना विरोध करणे म्हणजे हिंदुत्व नाही. या जमिनी अंबानी आणि अदानीला देण्याचा डाव आहे. मणिपूर राजवट बाबत सरकारने उशीर केला, पीएम याबाबत बोलत नाही. तिथल्या विध्वंसला सरकार जबाबदार आहे.
- ऑन बावनकुळे
पक्ष प्रवेश वेगळी भूमिका आणि वक्फ वेगळी भूमिका आहे, त्यात मागे पुढे काही नाही, भाजपला मदत केली म्हणजे हिंदुत्व आणि विरोध केला तर हिंदू नाही. आणि कुणी प्रवेश करत असेल तर करू द्या.
- ऑन श्रीकांत शिंदे
ते गद्दारी करून निवडून आले. पक्ष फोडला भाजपला पाठिंबा देऊन.
- ऑन चंद्रकांत खैरे
खैरे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, आणि मी कुठलाही कार्यक्रम केला नाही, माझ्या घरच्या लग्नात मी त्यांना बोलावले होते, आणि आदरही केला. मी त्यांचा मानपान करतो, आशीर्वाद ही घेतो.
- ऑन गडकरी
शिवाजी महाराज एकांगी कधीच नव्हते, ते सगळ्यांना सोबत घेऊन चालायचे. secular शब्दाबाबत माझं काही बोलणे नाही..
- ऑन एकनाथ शिंदे
गद्दारी करणारे काहीही बोलतात, कामराचे गीत का लागले सांगा ?
- ऑन पंकजा मुंडे :
बीड चा लढा जाती साठी नाही तर, गुन्हेगारी विरोधात आहे. तिथे खूप गुन्हेगारी आहे, प्रोत्साहन देणारे तिथलेच लोक आहेत. पंकजा ताई ने याचाही विचार करावा. तिथे राज्यकर्त्यांनी सगळं पोसल आहे, आणि त्या जात म्हणून राजकारण करत असेल तर, ती त्यांची भूमिका आहे.
- ऑन अजित पवार
अजित दादा यांनी बीड मध्ये गेल्यावेळी ही सुतासारखे सरळ करू म्हणाले, तरीही काही झाले नाही, गुन्हेगारी आणखी वाढली आहे.
- अमेरिकेने भारतावर २६% कर लावला. परंतु नरेंद्र मोदी व इतर सत्ताधार्यांनी कर कमी करण्यास आवाहनही केले नाही. सरकारने निषेध केला नाही. यात भारताच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान होणार.
- महापुरुषांचे आदर्श घ्यावे. ते पूजनीय आहे.
- तुम्ही निवडणुकीला जे पैसे वाटले, त्याची ही चौकशी करा. कामरा चौकशी करा, आमचा त्यात काही आक्षेप नाही.
- मिठी नदी घोटाळा बाबत २ ते ४ वर्षात काय झाल, ते सगळं तपासून घ्या. नामामी गंगे पासून सगळ्याची चौकाशी करा.
- कर्जमाफी म्हणजे मत घेण्यासाठी केलेली फसवणूक आहे. हे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळतात.
- बिष्णोई गॅंग कार्यरत असेल तर कठोर कारवाई व्हायला हवी, सुरेश धस महत्व वाढवून घेण्यासाठी ते आरोप करत असावेत.
- कुसुमाग्रज अध्यासन केंद्र होत आहे हि चांगली गोष्ट आहे, पण कामकाज सुरू करावे, उदघाटनाला कुणाची वाट पाहण्याची गरज नाही.
- मी ऑगस्ट पर्यंत विरोधी पक्ष नेता असलो नसलो तरी, शिवसेना नेते आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली