आमदार पुत्राच्या गळ्यात युवासेना तालुका प्रमुखपदाची माळ, अजय मोरे यांची नियुक्ती

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

आमदार पुत्राच्या गळ्यात युवासेना तालुका प्रमुखपदाची माळ, अजय मोरे यांची नियुक्ती

                                                    LOKSANDESH NEWS 




                आमदार पुत्राच्या गळ्यात युवासेना तालुका प्रमुखपदाची माळ, अजय मोरे यांची नियुक्ती



 एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहून पुन्हा विधानसभा निवडणुकीत विजय संपादन केलेले भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांचे पुत्र अजय मोरे यांची युवासेनेच्या भिवंडी तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख मदनबुवा नाईक आणि युवासेना ठाणे जिल्हाप्रमुख प्रभूदास नाईक यांच्या हस्ते अजय मोरे यांना पदनियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

 या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पदभार स्वीकारल्यानंतर अजय मोरे यांनी युवासेनेचे ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    आज पक्षाचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारणी बैठक संपन्न झाली. मार्गदर्शनाखाली अजय शांताराम मोरे यांची युवा सेना अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना दिलेली जबाबदारी ते पूर्णपणे पार करतील असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला. 




 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली