सावरकरांविरोधात बोलल्याने सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या जिभेला चटका दिला अनिल बोंडे यांची टीका

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सावरकरांविरोधात बोलल्याने सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या जिभेला चटका दिला अनिल बोंडे यांची टीका

                                                                LOKSANDESH NEWS 




 सावरकरांविरोधात बोलल्याने सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या जिभेला चटका दिला अनिल बोंडे यांची टीका


 स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याने सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांचे कान टोचल्याची प्रतिक्रिया राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केली आहे. डॉ. बोंडे म्हणाले, "जेव्हा राहुल गांधी सावरकरांविषयी वाह्यात वक्तव्य करत होते, तेव्हा मीच म्हटले होते की त्यांच्या आई सोनिया गांधी यांनी त्यांच्या जिभेला चटका द्यावा. पण त्यांनी ते काम केले नाही. मात्र, आनंदाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने हे काम केले आहे."ते पुढे म्हणाले, "स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १४ वर्षे काळकोठडीत हालअपेष्टा सहन केल्या.

 स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले. अशा महापुरुषांविरोधात उघडपणे अपमानास्पद बोलणे राहुल गांधींच्या स्तरात बसत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मी असे म्हणेन की सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जिभेला चटका दिला आहे. डॉ. बोंडे यांनी काँग्रेसवरही निशाणा साधत म्हटले, "राहुल गांधींवर टीका झाल्यावर काँग्रेसचे नेतेही सावरकरांविरोधात बोलायला लागतात. सर्वोच्च न्यायालयाची ही चपराक त्यांनी समजून घ्यावी.



 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली