शेतकऱ्यांबद्दल बोलत असताना सगळ्यांनी तारतम्य पाळावे - सदाभाऊ खोत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांबद्दल बोलत असताना सगळ्यांनी तारतम्य पाळावे - सदाभाऊ खोत

LOKSANDESH NEWS 


                     शेतकऱ्यांबद्दल बोलत असताना सगळ्यांनी तारतम्य पाळावे - सदाभाऊ खोत




 राज्याच्या कृषिमंत्री यांनी बोलत असताना शेतकरी लग्नावरती खर्च करत असतो, बारशावरती खर्च करत असतो आणि त्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झालेला असतो. खऱ्या अर्थान बघितलं तर शेतकऱ्यांच्या लेकरा बाळांची बार्शी आणि लग्न हे शेतकऱ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. ते सर्वजण साजरे करत असतात. त्यांच्या परिस्थितीनुसार करत असतात. परंतु जनतेच्या तिजोरी वरती दरोडे टाकून राजकारणातले राजकारणी ते पांढऱ्या कपड्यातले लायसनधारक दरोडेखोर हे आपल्या लेकरा बाळांच्या लग्नावरची खर्च करतात. तो खर्च जर बघितला तर एखाद्या अख्या गावचे लग्न होईल तेवढा खर्च हे राजकारनी दरोडेखोर आपल्या लेकरा बाळांचा लग्नामध्ये खर्च करतो. 

अंगामध्ये जॅकेट घालून एक किलोमीटरचा फेट्याचा तुरा काढून ते सगळे गब्बर सिंग अत्तर मारून स्वागताला थांबत असतात. अगदी इंद्रदेव अवतारावे असे अवतारतात. त्यांच्या लग्नाच्या मंडपाबद्दल कोण्ही बोलत नाही आणि शेतकऱ्याच्या लेकराबाळांनी लग्न केली की तुमच्या पोटामध्ये नऊ महिन्याच्या कळा सुटायला लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलत असताना सगळ्यांनी तारतम्य पाळावे. ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये बोलत होते. 

      राज्याचे कृषिमंत्री आणि या पद्धतीने आज शेतकऱ्याच्या संबंधांमध्ये उद्गगार काढले ते मला वाटतं योग्य आहे. असं मला वाटत नाही. परंतु त्यांचा बोलण्याचा हेतू वेगळा असू शकतो कृषिमंत्री झाल्यानंतर त्यांचं काम पाहिलं तर समाधानकारक आहे. या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे का तर निश्चित पणे दिली पाहिजे. कारण शेतकऱ्याचं कर्ज हे सरकारचं धोरणामुळे झालेला आहे आणि सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ठरलेलं आहे. 

  म्हणून खऱ्या अर्थाने शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते आपल्याला रद्द करावे लागतील. शेतमालाला चांगला भाव मिळेल या संदर्भामध्ये धोरण आखावी लागतील. आणि जोपर्यंत शेतीमध्ये आपण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवल असं धोरण आखणार नाही. शेतकरी विरोधी कायदे हठवणार नाही. तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतामध्ये कर्जाचे पीक येणार आहे. 




 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली