LOKSANDESH NEWS
पीक विमा बाबत पुन्हा एकदा पुनर्गठन करण्यात येणार - कृषिमंत्री माणिकराव कोकाटे
- अवकाळी पाऊस राज्यात सुरू आहे, आजचा एक दिवस पावसाचा अंदाज आहे.
- अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे, पंचनामे सुरू आहेत
- २४ जिल्ह्यात पाऊस झालेला, २५ ते ३० हजर हेक्टर वर नुकसान आहे
- पंचनामे झाल्यावर सरकार पातळीवर मदत करू.
- कांदा, द्राक्ष, गहू आणि फळ बागांचे देखील नुकसान झाले आहे.
- आपत्ती व्यवस्थापन च्या मधमयातून मदत केली जाणार आहे.
- मी देखील आज प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार आहे.
- एक रुपया पीक विमा बाबत पुन्हा एकदा पुनर्गठन करण्यात येणार आहे.
ऑन मसने कर्जमाफी आंदोलन
- त्यांना मागण्यांसाठी काही उरले नाही, त्यामुळे कर्ज माफी मुद्द्यावर ते आंदोलन करत आहेत.
- कर्ज माफी मुद्दा वादग्रस्त आहे, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील.
- काही शेतकरी नियमित कर्ज भरतात, त्यामुळे त्यांचे काय असा प्रश्न आहे. त्यामुळे यावर उच्च पातळीवर निर्णय होईल.
ऑन राऊत वक्तव्य
- संजय राऊत नेहमीच राजकीय विषयावर भाष्य करत असतात.
- मीडियाने दखल घेण्याचे काम आहे. बाकीच्यांनी दखल घेण्याचे काम नाही.
- फार टेंशन घेऊ नका, राजकारणासाठी ते काही ना काही बोलत असतात, त्यामुळे जनतेची करमणूक होत असते.
ऑन नंदुरबार दौरा
- सहा महिने पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात जात नाहीत.
- मी लवकरच नंदुरबारला जाणार आहे, अधिवेशन मध्ये असल्याने मला जाता आले नाही.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली