LOKSANDESH NEWS
ठाण्यातील कचरा कोंडी पडघा जवळील आतकोली डंपिंगवर; स्थानिकांमध्ये आक्रोश, 7 एप्रिल रोजी उग्र निदर्शने
ठाणे शहरातील कचरा भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या आतकोली या गावाच्या हद्दीत शासनाने दिलेल्या डंपिंग ग्राऊंडवर टाकला जात आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून, या डंपिंग विरोधात सर्वपक्षीय नागरिकांच्या साथीने 7 एप्रिल रोजी उग्र निदर्शने केली जाणार आहे.
भिवंडी तालुक्यातील मौजे आतकोली येथील सर्वे नंबर 4 ,5 ,13 व 14 मधील एकूण 34 (हेक्टर आर) जागा ही ठाणे महानगरपालिकास स्थानिकांच्या भावनांचा कोणताही विचार न करता दिली गेली. या जागेवर ठाणे पालिकेकडून सध्या दररोज 100 हून अधिक गाड्यांमधून हजारो टन कचरा टाकला जात असल्याने त्याच्या दुर्गंधीमुळे आतकोली व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा श्वास कोंडला जात आहे.
त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या भावना तीव्र असून त्या विरोधात सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळी लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने हे आंदोलन केले जाणार आहे. विशेष म्हणजे समृद्धी महामार्ग जाणार आहे.
तालुक्यातील या भागातील ३२ गावांच्या विकासाची जबाबदारी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांच्या कडे सोपवण्यात आली आहे. याच भागात मुंबई क्रिकेट असोसिएशन अंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली