पाण्यासाठी 60 फुट खोल विहिरीत उतरून युवकांचे आंदोलन, वडाळी गावात भीषण पाणी टंचाई
बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. जिल्हाधिकारी यांनी फक्त कागदोपत्री योजना राबविल्या जात असल्याचा भास निर्माण करीत आहेत. प्रत्यक्षात जिल्हावासियांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. 40 अंश तापमानत पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने जिल्हा प्रशासनावर रोष व्यक्त केला जात आहे. मेहकर तालुक्यातील वडाळी गावात दरवर्षी पाणी टंचाई भासत आहे.
असंख्य निवेदने देण्यात् आली, मात्र अद्याप पर्यंत पाण्याचा प्रश्न निकाली काढल्या गेला नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. वडाळी युवकांनी 60 फुट खोल विहिरीत आंदोलन केले पाणी द्या अन्यथा विहिरीतच जीव देतो, अशी भूमिका वडाळी ग्रामस्थांनी घेतली होती. मात्र प्रशासनाने पाणी देण्याचे आश्वासन दिल्यावर ग्रामस्थानी आंदोलन मागे घेतले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली