जिल्ह्याभरात जानेवारी ते मार्चपर्यंत थांबवले 53 बालविवाह, जालना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कोमल कोरे यांची माहिती

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जिल्ह्याभरात जानेवारी ते मार्चपर्यंत थांबवले 53 बालविवाह, जालना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कोमल कोरे यांची माहिती

LOKSANDESH  NEWS 



 जिल्ह्याभरात जानेवारी ते मार्चपर्यंत थांबवले 53 बालविवाह, जालना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कोमल कोरे यांची माहिती

जालना जिल्हा महिला बालविकास अधिकारी कोमल कोरे या जिल्ह्याभरात बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत 18 वर्षे आतील मुलींचे बालविवाह होणार नाही, याची खबरदारी घेत असून त्या संपूर्ण जिल्ह्याभरात गुप्त खबऱ्यामार्फत कुठेही बालविवाह होत असल्यास त्या ठिकाणी जाऊन आई-वडिलांना समज देऊन किंवा योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांनी बरेच बालविवाह थांबवले असल्याची माहिती दिली आहे.

   जालना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कोमल कोरे यांच्यावर जिल्ह्यातील सर्वात मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी म्हणजे महिला व बालविकास अधिकारी म्हणून पद, आणि या पदाच्या माध्यमातून त्या जिल्ह्याभरात लहान मुलींचे लग्न होणार नाही म्हणजेच 18 वर्षे आतील मुलींचे लग्न होणार नाही याची खबरदारी घेत आहेत. विभागाने जानेवारी 2025 ते मार्च 2025 या काळात 53 बालविवाह थांबवले आहेत.

 संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई सुद्धा केली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. तसेच गाव पातळीवर सुद्धा बालविवाह प्रतिबंधक समित्या नेमणूक करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामसेवक, शाळेचे मुख्याध्यापक, सचिव व सरपंच यांच्याकडे बालविवाह प्रतिबंधक सर्व अधिकार दिलेले आहे. त्यामुळे यांनी सुद्धा आपापल्या गावात खबरदारी घेत बालविवाह होणार नाही याची खबरदारी घ्यावी व असे कुठेही होत असल्यास त्वरित जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सुद्धा यावेळी त्यांनी केले आहे. 


 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली