गोंदिया जिल्ह्यातील 2217 वाहन धारकाचे जिल्हा परिवहन विभागाकडून तीन महिन्याकरिता लायसन्स रद्द

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

गोंदिया जिल्ह्यातील 2217 वाहन धारकाचे जिल्हा परिवहन विभागाकडून तीन महिन्याकरिता लायसन्स रद्द

                                                              LOKSANDESH NEWS 



गोंदिया जिल्ह्यातील 2217 वाहन धारकाचे जिल्हा परिवहन विभागाकडून तीन महिन्याकरिता लायसन्स रद्द

गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्हा परिवहन अधिकारी यांच्या द्वारा जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये मोहीम राबविण्यात आली आणि 2217 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आणि यांच्या लायसन्स अनुदिप्ती या तीन महिन्यासाठी रद्द करण्यात आल्यात. 

यामध्ये हेल्मेटचा वापर न करणे, मोबाईलवर बोलणे, सीटबेल्ट चा वापर न करणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे,अतिवेगात वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, अतिरिक्त भार घेऊन वाहन चालवणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे अशा विविध कारणास्तव या 2217 लोकांची लायसन्स तीन महिन्याकरिता जिल्हा परिवहन अधिकारी यांनी रद्द केले आहे.

 यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा, रस्ता ओलांडताना रस्ता नियमाचे पालन करावे जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही याची खबरदारी करण्याचे आव्हान यावेळी जिल्हा परिवहन अधिकारी यांनी व्यक्त केला.




 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली