पुण्यातील भर रस्त्यावर अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा सातारा पोलिसांच्या ताब्यात
पुण्यातील येरवडा सारख्या गजबजलेल्या परिसरात भर रस्त्यातच लघुशंका करून अश्लिल चाळे करणारा आणि पुणेकरांच्या संस्कृतीला बदनाम करणारा गौरव आहुजा अखेर सातारा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.
आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप करत सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करून त्याने माफी मागत आपण कराड पोलिसांच्या शरण जाणार असल्याचे म्हंटले होते.
त्यानुसार सातारा पोलिसांनी आपली गोपनीय यंत्रणा हलवून अखेर गौरव आहुजाला ताब्यात घेतले गौरव हा कराड मध्येच असल्याची माहिती सातारा पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून मिळाल्याने त्याला पकडण्यासाठी पोलिसांच्या विविध पथकांकडून सापळा रचन्यात आला होता. अखेर गौरव आहुजाला सातारा शहरातील पोलीस मुख्यालयाच्या परिसरात अटक करण्यात आली असून, तो सातारा पोलिसांच्या ताब्यात आहे
. सोशल मीडियावर विविध व्हिडिओ अपलोड करून तो पुणे पोलीस आणि सातारा पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याचा तपास करत सातारा पोलिसांनी गौरवला ताब्यात घेतले आहे.
अधिक चौकशीसाठी त्याला सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासमोर देखील उभ करण्यात आल्याची माहिती समोर येत असून त्याचा सखोल तपास केल्यानंतर सातारा पोलिसांकडून पुणे पोलिसांकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिले आहे.