LOKSANDESH NEWS
सिकलसेल ग्रस्त रुग्णांना जिल्हा रुग्णालयात घ्यावे लागतात जमिनीवर उपचार
अमरावती जिल्हाच्या मेळघाट येथून सिकलसेल बाधीत रुग्ण उपचार घेण्यासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात येतात. मेळघाटातील आदिवासींसाठी मेळघाट सेल केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे.
कारण की कोणताही आदिवासी रुग्ण उपचार घेण्यासाठी आला तर त्या रुग्णाला कोणत्या प्रकारची अडचण येऊ नये म्हणुन मेळघाट सेल केंद्राची निर्मिती जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली असतांना ती फक्त केवळ कागदावरचं दिसून आली.
कारण वार्ड नंबर 4 मध्ये एका एका बेडवर दोन दोन रुग्ण उपचार घेत असल्याने सिकलसेल बाधी रुग्णाला जमिनीवर झोपून उपचार घ्यावा लागत आहे.