LOKSANDESH NEWS
खामगावच्या उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन ही मागील सात ते आठ महिन्यांपासून बंद पडलेली आहे.
परंतु आरोग्य विभागाने याबाबत अद्याप कोणतीच ठोस पावले उचलले नाही. जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, आणि खामगाव या परिसरातील सामान्य गोरगरीब रुग्ण सिटीस्कॅन करिता खामगाव येथेच जातात.
परंतु खामगाव सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद असल्याने गोरगरिबांना पुढील उपचाराकरिता अकोला जावे लागते किंवा परिस्थिती नसताना खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची वेळ यामुळे रुग्णांवर आली आहे.
तर पाठपुराव्यानंतर येत्या दोन दिवसात सिटीस्कॅन मशीन सुरू होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे यांनी बोलताना दिली आहे.