विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
जालन्यात सामूहिक आत्मदहन आंदोलन इशारा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अंशत: अनुदानित शिक्षकाचे सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यासाठी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय. 14 ऑक्टोबर 2024 चा शासन निर्णय लागू करून 20 टक्के टप्पा अनुदान देणे या प्रमुख मागणीसाठी आजचा मोर्चा काढण्यात आलाय. 20 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना भेटून सामूहिक आत्मदहन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
मोर्चा अंबड चोफुली येथून सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यलयावर काढण्यात आलाय.
आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा येताच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत ठिय्या सुरु केल. त्यानंतर शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.
अजित पवारांनी हक्काचा शिक्षकांचे पगार देण्यात यावा, दोन दिवसात निधीची तरतूद केली नाही तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. वेळ प्रसंगी रस्त्यावर येऊ, असा थेट इशाराच देण्यात आला आहे. तूर्तास बैठक घेऊन शिक्षकांचा पगार द्यावा, अशी विनंती देखील यावेळी आंदोलनकांनी केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली