LOKSANDESH NEWS
निल्लोड येथील परिसरात भीषण पाणी टंचाई
सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील तलाव कोरडा पडल्याने परिसरात भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
सिल्लोड तालुक्यामध्ये असलेल्या निल्लोड गावाची तसेच पंचक्रोशीतील वस्त्यांना जल संकटाचा सामना करावा लागतोय. या वस्त्यांना आणि गावांना पाणीपुरवठा करणारा निल्लोड येथील तलाव कोरडा पडला आहे, एकीकडे पडलेला कमी पाऊस, दुसरीकडे झालेला उपसा यामुळे परिसरात पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले असून,
हा उन्हाळा निल्लोड गावासाठी संकटाचा जाणार आहे. सध्या निल्लोड परिसरातील अनेक विहिरींनी तळ गाठला असून, जेम तेम असलेल्या पाणी काढण्यासाठी विविध आड व विहिरीवर महिलांची गर्दी दिसून येत आहे. तर नाईलाजाने खासगी टँकर द्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली