रिक्षा चालकांकडून प्रवाशांची चाललेली लूट थांबवण्यासाठी राष्ट्रवादीने दिले पोलीस उपायुक्तांना निवेदन
भिवंडी शहरात अंतर्गत भागीदारी पद्धतीने चालणाऱ्या रिक्षा बेकायदेशीर पद्धतीने प्रत्येक प्रवासी यांच्या कडून 15 रुपये प्रति भाडे आकारात आहे
ते पूर्णपणे गैर कायदेशीर असून त्यांना अशा कोणत्याही प्रकारचे प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे यांच्याकडून परवानगी देण्यात आलेली नाही. सध्या रिक्षाचे मीटर 23 रुपये असून, ते 26 रुपये होणार आहे. याच प्रमाणे भागीदारी पद्धतीने रिक्षा चालवत असणाऱ्या प्रत्येक दहा रुपये प्रति प्रमाणे प्रवासी भाडे आकारल पाहिजे.
परंतु भिवंडीतील रिक्षा चालक कायदेशीर कोणतीही परवानगी न घेता प्रत्येक प्रवासी कडून सध्या पंधरा रुपये प्रमाणे दर आकारत आहे.
ते चुकीचे असून भिवंडीतील जनतेची सरळ लूट करत असून या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी पोलीस उपायुक्त यांना भेटून निवेदन सादर केले आहे.