LOKSANDESH NEWS
विट्यात सेफ स्ट्रीट उपक्रमाचा शुभारंभ आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते संपन्न
महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 100 दिवसाच्या सात कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने विटा पोलिस स्टेशनच्या वतीने रस्ता सुरक्षा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विटा हायस्कूल विटा हा रस्ता सेफ स्ट्रीट म्हणून घोषित करण्यात आला. या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी विटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली