LOKSANDESH NEWS
जालना ते नांदेड महामार्गावर मराठा समाजाचे रास्ता रोको आंदोलन
जालना ते नांदेड महामार्गावरील नेर फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय. त्यामुळे ठिकठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.
जालना ते नांदेड महामार्गावरील नेर फाटा येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावं,
अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी केली आहे.