LOKSANDESH NEWS
नागपूर प्रकरणाची एनआयए अशा संस्थांच्या माध्यमातून चौकशी करावी - किरीट सोमय्या
ON नागपूर दंगल
नागपूर मध्ये झालेल्यादंगलीचा सूत्रधार फईम खान हा आहे. याच फईम खानच मालेगाव, बांगलादेशचे देखील कनेक्शन आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हा फईम मालेगावला जात होता. त्याने स्वतःच्या कार्यालयाच उद्घाटन देखील केलं.
मालेगाव येथील व्होट जिहाद फंडिंग घोटाळा मी बाहेर काढला होता. त्यांचे पैसे संघटनेकडे गेले आहे. नागपूर मध्ये जी दंगल झाली त्यासाठी जो सोशल मीडियावर मेसेज आला तो मेसेज बांगलादेश येथून आला होता. यामुळे मी नागपूर, मालेगाव पोलीस आयुक्त व मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे या प्रकरणात एनआयए व त्यासारख्या संस्थांच्या माध्यमातून चौकशी करून या प्रकरणातील कांड बाहेर काढावे.
ON दिशा सालीयन प्रकरण
दिशा सालीयनच्या वडिलांना न्याय मिळत नाही. न्याय मागण्यासाठी त्यांना न्यायालयात जावं लागत आहे. न्यायालयाने जो आदेश दिला तो सर्वांना पाळावा लागेल. मात्र, मुलीच्या वडिलांनी त्यांच्यावर आरोप केले त्यांना देखील स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. मग त्यामध्ये ठाकरे असो किंवा इतर कोणीही असू दे त्यांना स्पष्टीकरण द्यावा लागेल