LOKSANDESH NEWS
जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने कलिंगडांची आवक वाढली; दर कमी असल्याने शेतकरी चिंतेत
जिल्ह्यात प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदाही उन्हाळ्यात कलिंगड बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. जिल्ह्यात कलिंगडाची आवक सुद्धा वाढली आहे. शेतकऱ्यांचा कल सुद्धा कलिंगड लागवडीकडे वाढू लागला आहे.
मात्र, यंदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केल्यामुळे बाजारात कलिंगड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
कलिंगडाची मागणी सुद्धा आहे. मात्र, उत्पादन जास्त वाढल्याने कलिंगडाला दर जे मिळायला पाहिजे ते शेतकऱ्यांना मिळत नाही. 10 ते 20 रुपये किलो दर मिळणारे कलिंगड आता पाच ते दहाच्या आत विकत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली