चोपड्यात मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

चोपड्यात मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी

                                                              LOKSANDESH NEWS 




                                              चोपड्यात मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी




 मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होता आणि आज देशभरामध्ये मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात येत आहे. चोपडा शहरातील मुस्लिम बांधवांनी शिरपूर रस्त्या लगत असलेल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.  छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शिंदे गटाच्या पेंडॉलमध्ये आमदार चंद्रकांत सोनवणे,  कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील, विकास देशमुख यांच्यासह पदाधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेसच्या पेंडॉल मध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती, चोपडा शहराचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, घनश्याम पाटील यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या. 

यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडु नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे, मोठ्या उत्साहात व आनंदात रमजान ईद मुस्लिम बांधवांकडून साजरी होत आहे. 



 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली