LOKSANDESH NEWS
सरपंच हर्ष मोदी यांच्या नेतृत्वात सौंदड येथे भव्य शंकरपटाचे आयोजन
गोंदियातील सौंदड गावात 2 दिवसीय जंगी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या जंगी शंकर पटाला तुफान गर्दी उसळली होती. मोठ्या संख्येने पटप्रेमी या ठिकाणी आले होते.
बैलांच्या शर्यतींवरून बंदी उठल्याने शंकर पटाचे आयोजन करण्यास सुरुवात झाली असून, शेकऱ्यांमध्ये आनंद दिसून येत आहे. तर या शंकर पटात 102 च्या वर बैलजोड्या सहभागी झाल्या.
सोशल मीडियाच्या काळामध्ये गावातील नागरिक एकत्र रहावे व जुन्या रूढी परंपरा या नव्या पिढीला कळाव्या या हेतूने हे शंकरपटाचे आयोजन केले असल्याची प्रतिक्रिया आयोजक सरपंच हर्ष मोदी यांनी दिली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली