LOKSANDESH NEWS
शिक्षण संचालक कार्यालयासमोर विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन
महाराष्ट्र शासनाने राज्यातील सात साडेसात हजार शाळांना अनुदान देण्याचे घोषित केले आहे. मात्र याला निधीची आवश्यकता आहे. निधीच नसल्याने या घोषणेचा फक्त तोंडाला पाने पुसण्यासारखेच झाले आहे. या अधिवेशनात निधीची तरतूद होईल अशी अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही.
याच त्रासाला कंटाळून बीड येथील नागरगोजे नावाच्या शिक्षकाने आत्महत्या केली.
त्यामुळे येत्या 26 तारखेपर्यंत निधीची तरतूद झाली नाही तर ज्याप्रमाणे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्ये होत आहे तशाच आत्महत्या शिक्षकांच्या देखील होतील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली