पनवेल महापालिकेने देशात प्रथमच एआयच्या टेक्नॉलॉजी माध्यमातून श्वान-मांजरांचे सर्वेक्षण
पनवेल महापालिकेने देशातील पहिली महापालिका म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भटके श्वान आणि मांजरांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या सर्वेक्षणामुळे रेबीजमुक्त शहर बनवण्यास मदत होणार असून, ४० टक्के भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या सर्वेक्षणाच्या अहवालानंतर महापालिकेने श्वान व मांजरांच्या लसीकरण आणि निर्बीजीकरणासाठी पुढचे पाऊल उचलले आहे. एप्रिलपासून पालिका क्षेत्रात दोन फिरते दवाखाने सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य विभाग उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली. पनवेल महापालिकेने एआयच्या माध्यमातून देशात प्रथमच भटके श्वान आणि मांजरांचे सर्वेक्षण पूर्ण करणार.
भविष्यात रेबीजमुक्त शहरासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली