कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना


लोकसंदेश साठी पुणे जिल्हा प्रमुख
पारस मुथा

दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना बिबवेवाडी परिसरात घडली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा झाला असून, हे अपहरण खरे नसून व्यापाऱ्याने स्वतःचाच अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले आहे.


पुण्यातील हिरे व्यापारी तिथल शहा सोमवारी संध्याकाळी सहा वाजता आपल्या पत्नी आणि मुलासोबत होते. त्यांनी मुलाला पत्नीच्या ताब्यात सोपवले आणि काही कामासाठी कॅम्पला जात असल्याचे सांगून निघून गेले. काही वेळाने त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. या कॉलवर "मैने आपके पति को उठाया है, दो करोड तयार रखो," अशी धमकी देण्यात आली. घाबरलेल्या पत्नीने तातडीने पोलिसांत धाव घेतली.


घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. व्यापाऱ्याचे शेवटचे लोकेशन नवले पूल परिसरात आढळले, तिथेच त्यांची दुचाकीही सापडली. मात्र, सखोल चौकशीत तिथल शहा यांनी आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले.

व्यापारी तिथल शहा काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होते. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांनी अनेकांकडून पैसे घेतले होते. कर्जाचा भार वाढल्याने त्यांनी बनावट अपहरणाचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. दरम्यान, तिथल शहा सुखरूप घरी परतले असून, पोलीस त्यांच्याकडून अधिक चौकशी करत आहेत. हा प्रकरण आणखी मोठे गुंतागुंतीचे आहे का, याचा तपास सुरू आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.