LOKSANDESH NEWS
आज एकसंबा येथे एकसंबा दत्तवाड रस्त्यावर एका विहिरीत दोन मुले विहिरीच्या पडल्याने मृत्यु झाला.
विहरीत बुडून दोघा मुलांचा दुर्दैवी अंत एकसंबा येथील घटना रंगपंचमी खेळून पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मुलांचा तोल जाऊन विहरीत पडल्याने दोघा मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना एकसंबा येथे बुधवारी 19 रोजी घडली वेदांत संजू हिरेकुडे वय नऊ आणि मनोज काशिनाथ कल्याणी वय आठ अस मृत मुलांची नाव आहे सदर घडलेल्या घटनेमुळे होरेकुडे व कल्याणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला या घटनेची नोंद सदलगा पोलिस ठाण्यात झाली आहे या घटनेविषयी अधिक माहिती अशी बुधवारी सकाळी रंगपंचमी खेळून बागेवाडी यांच्या शेतात असलेल्या विहिरीत वेदांत आणि मनोज दोघे आंघोळीसाठी पोहण्यास गेले होते उशिरापर्यंत तो दोघेही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली दरम्यान बागेवाडी त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीजवळ कपडे चप्पल आणि बादली आढळली यावरून दोघे मुले विहिरीत पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला
यावेळी गावातील काही युगांनी पाण्यात शोधाशोध केली असता दुपारी पहिला वेदांत हिरेकुड याचा मृत्युदेह बाहेर काढण्यात आला विहरीत पाणी भरपूर असल्याने दुसऱ्या मनोज कल्याणी याचा मृत्युदेह शोधण्यास अडथळा निर्माण होत होता स्थानिकांनी विरीतील पाणी बाहेर काढून सदलगा अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केलं तसेच औवाड येथील वजीर रेस्क्यू फोर्स जवानांना देखील पाचारण करण्यात आलं सदलगा आणि औवाड येथील जवानांनी संयुक्तपणे मनोजचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली सायंकाळी मनोज कल्याणीचा देखील मृतदेह सापडला वेदांत संजू हिरेकुडे हा मूळचा केरूर गावचा रहिवाशी असून आजोळ एकसंबा इथे आजोबांच्या घरी राहण्यास व शिक्षणासाठी होता त्याचे वडील भारतीय सैन्यदलात आहेत त्याच्या पश्चात आई वडील व भावा असा परिवार आहे तर मनोज कल्याणी याच्या वडिलांच यापूर्वीच निधन झालय त्याच्या पश्चात आई बहीण व आजी असा परिवार आहे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली