LOKSANDESH NEWS
शेतकरी नेत्यावर खंडणीचे आरोप, शेतकऱ्यांकडून उकळलेले पाच लाख
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डी यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी खंडणी उकळण्याचा आरोप केलेला असून आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव त्यांना शेतकऱ्यांकडून लोटपात झालेली असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या जिगाव या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात गावठाण क्षेत्राकरिता शासनाने शेतकऱ्यांच्या शेती घेतलेले असून त्यासाठी मोबदला शेतकऱ्यांना दिला जात आहे. मात्र हा मोबदला प्रति हेक्टर 40 लाख रुपये मिळवून देतो असे आम्हीच दाखवून शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करीत आणखीन पैशासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीतील प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर हे त्रास देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करीत आज शेगाव येथील जिगाव प्रकल्पा अंतर्गत शेतकरी व अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये प्रशांत डीक्कर यांना शेतकऱ्यांनी लोटपाट करीत बैठकीतून हाकलून लावण्याचा प्रकार समोर आलेला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रशांत ढेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळ या गावाच्या सरपंचा पुष्पा संदीप मोरखडे यांनी रीतसर शहर पोलिसात तक्रार नोंदविली यावरून अधिक कर यांच्या विरोधात खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शेतकरी नेते प्रशांत डेक्कर हे शेतकऱ्यांनाच ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकडण्याचा प्रकार करीत आहे आम्ही सर्वत्र झालेलं असून आज पोलिसात तक्रार नोंदविली. आमची एवढीच मागणी आहे की दिक्करांनी आम्हाला मिळत असलेल्या आर्थिक मोबदल्यात ढवळाढवळ करू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली