LOKSANDESH NEWS
सरकारने आणलेले विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ ची भाकपच्या वतीने शहीद दिनी करण्यात आली होळी
व्यक्ति आणि संघटनांचे घटनात्मक अधिकार संपूर्णपणे नष्ट करणारे, लोकशाहीविरोधी 'महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२४' (सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३३) मागे घेण्यात यावे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष डाव्या व प्रागतिक पक्ष व संघटनांच्या वतीने आज २३ मार्च रोजी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनाच्या दिवशी निदर्शने करून या प्रस्तावित विधेयकाची होळी करण्यात आली. या वेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे राज्य कौन्सिल सदस्य संजय नांगरे, भगवान गायकवाड, बबनराव पवार, दत्ता आरे, बबनराव लबडे, ॲड. गणेश ताठे, विष्णू गोरे, संजय गुजर, राजेंद्र मोहिते, मुन्ना भोकरे, अशोक चव्हाण, विजय मगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रस्तावित विधेयक हे लोकशाही विरोधी असून, अशाप्रकारचे विधेयक पब्लिक सेफ्टी बील म्हणून १९१८ साली ब्रिटिश सरकारने आणले होते. शहीद भगतसिंग बटुकेश्वर दत्त यांनी त्यावेळी असेम्ब्लीत जीवितहानी होणार नाही, सभागृहात आवाज होऊन लक्ष वेधण्यासाठी बॉम्ब टाकून आवाज केला होता व विरोध दर्शविला होता, त्या वेळी ते बील रद्द करण्यात आले होते. तशाच प्रकारचे विधेयक महाराष्ट्र सरकारने आणलेले आहे. त्याचे सर्व प्रकारच्या घटनात्मक अधिकारावर दुरगामी परिणाम होणार आहेत, सत्तेला विरोध करणाऱ्या राजकीय पक्ष, व्यक्ती, संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जाईल, अर्बन नक्षलच्या नावाखाली श्रमिक, कामगार, कर्मचारी, शेतकरी यांच्या चळवळींना मोडून काढण्यासाठी वापर केला जाईल, सरकारचा उद्देश विरोधकांचा आवाज दाबण्याचा असून, त्या मुळे अशा या जनविरोधी घटनाविरोधी विधेयकाला सर्व स्तरातून जोरावर विरोध व्हायला हवा व हे विधेयक कुठल्याही परिस्थितीत मंजूर होणार यासाठी राज्यातील सर्व लोकशाहीवादी पक्ष, संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे असे प्रतिपादन कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी केले.
शेवगाव येथे रविवार दिनांक २३ मार्च रोज बसस्थानक चौकात चौकातील भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन करून महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाची होळ करण्यात आली. या वेळी नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली