शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली शहरा लगतच मिरज,कुपवाड किंवा शहरापासून दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर होणे अपेक्षित होते.परंतु हे विद्यापीठाचे उपकेंद्र साठ ते सत्तर किलोमीटरच्या अंतरावर म्हणजेच खानापूरला देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले,त्यामुळे सांगलीतील इतर तालुक्यातील शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना परत ९०ते १०० किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी जावे लागणार आहे.अनेक वेळा शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली मध्ये होण्यासाठी आम्ही शिष्ट मंडळ घेऊन अनेक वेळा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू,राज्यपाल, मुख्यमंत्री,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्याकडे अनेक वेळा निवेदन दिले होते,यामध्ये म्हटले होते की उपकेंद्र हे सांगली शहरात लगदच व्हावे परंतु विधिमंडळात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खानापूर तालुक्यात करण्याचा निर्णय घेतला आहे,परंतु जिल्ह्यातील अनेक भागातील व अनेक तालुक्यातील विद्यार्थी, विद्यार्थिनी,शिक्षक, प्राध्यापक,आणि पालकांना खानापूरला जाणे गैरसोयीचे आहे,
त्या ठिकाणी राहण्याची,जेवणाची,वाहतुकीचा, व सर्वात महत्त्वाचा म्हणजे विद्यार्थ्यांनी महिलां,युवती साठी हे ठिकाण भविष्यकाळात धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ते ठिकाणअनेक गैरसोयीचे होणार आहे.
तसेच खानापूर मध्ये दळणवळणाच्या व इतर सोयी साठी गैरसोय होण्याची शक्यता असल्यामुळे विद्यापीठ उपकेंद्र हे सांगली शहरात असल्यामुळे तसेच या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कामे असतील तर ते करण्यासाठी सोपे झाले असते. विद्यापीठ उपकेंद्र सांगलीत झाल्यामुळे सांगलीच्या वैभवात भर पडली असती व सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे ते सर्वांना सोयीस्कर झाले असते.सांगलीतील दळण वळणांचा फायदा चलन वाढीसाठी झाला असता, छोटे-मोठे व्यवसाय, उद्योजक व्यापारी वर्गांना खूप मोठा फायदा झाला असता, परंतु गेल्या तीन टर्म आमदार राहिलेले व दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ यावरच निवडून आलेले आमदार सुधीर दादा गाडगीळ हे निष्क्रिय असल्याचे दिसून आले. या आमदारांना सांगलीच्या विकासाबद्दल काही देणे घेणे नाही अशी दिसते.
तेथील नागरिकांचा जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु सांगलीचे आमदार विधिमंडळात प्रश्न कधीही मांडत नाहीत कायम मौनी बाबाचे रूप धारण केल्यासारखे वागतात. . त्यामुळे सांगलीत होणारे विद्यापीठ उपकेंद्र हे खानापूरला हलवले गेले हे केवळ आणि केवळ सांगलीच्या आमदाराच्या दुर्लक्षतेमुळे शहरातील सर्व विद्यार्थी,नागरिक हे विधिमंडळात सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ हे झोपा काढतात की काय अशी चर्चा करू करू लागले आहेत.अशी माहिती प्रवक्ते मा. संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिली आहे.
या वेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे, एम के कोळेकर, खुदबुद्दीन मुजावर व अनेक जण उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली