LOKSANDESH NEWS
हनुमान टेकडी जलशुद्धीकरणाचे काम मजुरांअभावी पडले बंद
धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्राच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, मजूर मिळत नसल्याचे कारण सांगत हे काम गेल्या एक महिन्यापासून बंद पडले आहे. धुळे शहरातील नकाने तलावातील पाणी हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्रात आणून त्याच्यावर तिथे शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जात होती.
मात्र, हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्र हे जुने असल्याने त्याची क्षमता घटली होती. त्यामुळे अमृत योजनेतून या केंद्राचे नूतनीकरण करण्यात येत आहे. जलशुद्धीकरण केंद्राच्या नूतनीकरणाच्या कामाला दोन महिन्यांपूर्वी प्रारंभ होऊन देखील मजूर मिळत नसल्याने हे काम सध्या बंद करण्यात आले आहे. हे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली