LOKSANDESH NEWS
बेघर नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
हरसुल येथील मूलनिवासी नगरातील बेघर नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवारा मिळण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. यावेळी नागरिकांनी आंदोलन स्थळी दगडाच्या चुली पेटवल्या.
हरसुल येथील गायरान जमिनीवर बेघर लोक राहत होते. पंतप्रधान मंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने दोन दिवसांपूर्वी तोडक कारवाई करून जागा रिकामी करून घेतली. यामुळे येथील नागरिकांनी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखेचे विजय वानखेडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सुरू केले आहे. नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संसार थाटला असून, आम्ही बेघर आहोत.
आमची राहण्याची सोय होईपर्यंत इथे स्वयंपाक करून राहणार असे
म्हणत नागरिक आक्रमक झाले आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली