सैलानी बाबांची संदल मिरवणूक; शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सैलानी बाबांची संदल मिरवणूक; शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम

LOKSANDESH NEWS 


 

| सैलानी बाबांची संदल मिरवणूक; शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम

- बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावाजवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा असून सैलानी बाबांच्या यात्रेला नारळाच्या होळी दहनाने सुरुवात झालीय. जवळपास महिनाभर चालणाऱ्या यात्रेचे दुसरे महत्त्वाचे आकर्षण हे सैलानी बाबांची संदल मिरवणूक असते. 

संदल मिरवणूक ची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम असून, हजारो भाविकांच्या उपस्थितीत सैलानी बाबांच्या दर्गाहवर संदल चढविण्यात आला. या वेळी दरगाह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तर उपस्थितीत भाविकांनी संदल चे मनोभावे दर्शन घेतले.



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली