बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी मंत्री योगेश कदम, मंत्री भरत गोगावले यांनी दिली भेट
ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी तीन दिवसांचे अन्नत्याग आंदोलन सुरू केले. शेतकरी, दिव्यांग, विद्यार्थी आणि विविध घटकांसाठी सरकारने त्वरित ठोस निर्णय घ्यावेत, या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन पुकारले.
प्रमुख मागण्यात दिव्यांग कर्जमाफी, दिव्यांगासाठी दरमहा 6000 मानधन, बजेटच्या 5 टक्के निधी दिव्यांगासाठी,स्वतःच घर, प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन, स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना स्टोल, दिव्यांगासाठी राष्ट्रीय बँक निधी, आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मंत्री योगेश कदम व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी आज उपोषण स्थळी भेट दिली व दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी सरकार प्रयत्नशील असून, मागण्यांची पूर्तता करण्यात सरकार सकारात्मक भूमिकेत असल्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी आश्वाशीत केले.
याच ठिकाणी शहिद दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.