LOKSANDESH NEWS
सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मनसे आक्रमक; सिडकोविरोधात आंदोलनाचा दिला इशारा
नवी मुंबईतील विविध ठिकाणी सिडकोतर्फे २६ हजारोंच्या घरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र सिडकोच्या घरांच्या किंमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाही, त्यामुळे मनसे आक्रमक झाली असून,
सिडकोने घरांच्या किमती कमी कराव्या अशी मागणी केली होती.
मात्र सिडको प्रश्नाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे नवी मुंबई मनसेने आता आंदोलनाची भूमिका हाती घेतली आहे. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वात सिडको प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण पुकारण्यात येणार आहे. पत्रकार परिषद घेऊन मनसेने याची माहिती दिली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली