रविकांत तुपकरांना पोलीस बंदोबस्तात बुलढाण्यात आणलं

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

रविकांत तुपकरांना पोलीस बंदोबस्तात बुलढाण्यात आणलं

LOKSANDESH NEWS 



रविकांत तुपकरांना पोलीस बंदोबस्तात बुलढाण्यात आणलं





 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या रविकांत तुपकरांना काल खालापूर पोलिसांनी अटक केली होती. शेतकरी व पोलिसांमध्ये मोठा संघर्ष काल मुंबईच्या वेशीवर पाहायला मिळाला. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. पण तुपकरांच्या शिलेदारांनी अरबी समुद्रात जाऊन सातबारे व सोयाबीन फेकून आंदोलनाचा झेंडा रोवलाच. पुन्हा रविकांत तुपकर अरबी समुद्राकडे जाऊ नयेत यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जातीये. 

रात्री तुपकरांची सुटका झाल्यावर मात्र मुंबई पोलीस रविकांत तुपकरांना घेऊन आता मुंबईहून बुलढाणाच्या दिशेने निघाले आहेत

 रविकांत तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांना मुंबई पुणे इतरत्र कुठेही जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे रविकांत तुपकरांच्या गाडीच्या मागे पुढे पोलीस गाड्या स्कॉटिंग करत आणि प्रत्येक पोलीस स्टेशन च्या हद्दीत मुंबई पासून बुलढाणापर्यंत येण्याच्या मार्गावर त्या ठिकाणावर पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले होते. तुपकरांसाठी प्रत्येक पोलीस स्टेशन हाय अलर्ट मोड वर आहे. तुपकरांना पुणे मुक्कामी जायचे होते, पण पोलिसांनी विरोध केल्याने त्यांना बुलढाण्यात यावं लागलं.

 तर आता रविकांत तुपकर पुढे काय भूमिका घेतात पाहणं महत्वाचं ठरणार आहे.




 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली