LOKSANDESH NEWS
अमरावती जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू
अमरावती जिल्हा वकील संघाच्या २०२५-२०२६ वर्षांसाठीच्या कार्यकारीणीच्या निवडणुकीसाठी आज, शनिवार (२९ मार्च) रोजी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. अमरावती जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सकाळपासूनच वकील मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी गर्दी केली.
या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, ग्रंथालय सचिव आणि कार्यकारी सदस्यपदांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अध्यक्षपदासाठी ऍड. सुनील देशमुख आणि ऍड. हरीश निंबाळकर यांच्यात थेट मुकाबला होत असून, उपाध्यक्षपदासाठी ऍड. विनोद दशस्त्र आणि ऍड. आशिष लांडे यांच्यात स्पर्धा आहे.
सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत आहे. उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विजयासाठी प्रत्येकजण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी मुख्य निवडणूक अधिकारी ऍड. आर. बी. कलंत्री आणि उप-निवडणूक अधिकारी ऍड. शहजाद नय्यर हे जबाबदारी सांभाळत आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली