सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त तथा प्रशासक श्री. रविकांत अडसूळ यांनी आज आरोग्यवर्धिनी केंद्र , हनुमान नगर सांगली येथे भेट देऊन आरोग्य केंद्राची पाहणी केली.
यावेळी आरोग्य केंद्राला लागणाऱ्या सुविधांची माहिती घेत आवश्यक सुविधा आणि साधनसामग्री पुरवण्याची ग्वाही दिली.
तसेच महापालिका क्षेत्रात असणारे सर्व आरोग्य वर्धिनी केंद्र व महापालिका दवाखाने हे आणखीन सक्षमपणे चालवून नागरिकांना जास्तीत जास्त आरोग्यसेवा देण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
यावेळी त्यांच्यासमवेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, आरोग्यवर्धिनी केंद्र हनुमाननगरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया हंकारे , डॉ. शीतल धनवडे आणि वैद्यकीय स्टाफ उपस्थित होता.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली