प्रशासनावर आत्ताच्या राज्यकर्त्यांचा अजिबात वचक नाही - विनायक राऊत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

प्रशासनावर आत्ताच्या राज्यकर्त्यांचा अजिबात वचक नाही - विनायक राऊत

                                                        LOKSANDESH NEWS 




                        प्रशासनावर आत्ताच्या राज्यकर्त्यांचा अजिबात वचक नाही - विनायक राऊत




ON "सौगात ए मोदी" उपक्रम

- या उपक्रमाबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे म्हणाले ते खरे आहे. कारण काल-परवापर्यंत मुस्लिमांच्या विरोधात खूप तिखट भाषा वापरायची आणि त्यांना उध्वस्त करण्याची भाषा वापरली जात होती. परंतु येणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुस्लिम मतांना आकर्षित करण्यासाठी "सौगात ए मोदी" हा उपक्रम राबविला जात आहे. गोरगरिबांना मदत करायला हरकत नाही, पण त्याच्यामध्ये त्यांचा पक्षस्वार्थ आहे. आत्ता तुम्हाला मुस्लिमांची आठवण होत आहे. पण काही दिवसांपूर्वी मुस्लिमांची हकालपट्टी करू त्यांना उध्वस्त करू असे बरळणारे नितेश राणे यांच्या वाचेवर त्यांनी का बंदी आणली नाही? त्यांच्यावर कोणतेच बंधनच नव्हते. त्यामुळे "मुह मे राम, बगल मे छुरी" या पद्धतीचे वर्तन आहे.


ON सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा होणारा त्रास

- याबाबत प्रशासनावर आत्ताच्या राज्यकर्त्यांचा अजिबात वचक नाही. याबाबत मी उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. अनेक प्रश्नांबाबत उद्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेईन. त्यामध्ये वन्यप्राणी, शासकीय मेडिकल कॉलेज हे प्रश्न आहेत. वन्यप्राण्यांच्या त्रासाबाबत ज्या पद्धतीने वनखात्याला कामाला लावले पाहिजे, ते होऊ शकत नाही. माझ्या कारकिर्दीमध्ये माणगाव खोऱ्यातील हत्तींना जेरबंद करण्यात आले होते. दोडामार्गमध्ये हत्ती पिसाळले असून, राजापूरपासून सिंधुदुर्गात  बिबटे येत आहेत. त्यामुळे प्राण्यांनाच नव्हे तर मनुष्यांना सुद्धा बाहेर फिरणे मुश्किल होऊन बसले आहे. 


ON चिपी विमानतळ सेवा बंद

- ही दुर्दैवी घटना आहे. आम्ही अथक प्रयत्नातून सुरू केले. चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यावेळचे हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अथक प्रयत्नातून चिपी विमानतळ सुरू झाले. मी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "उडान" या योजनेअंतर्गत रिजनल कनेक्टिव्हिटीतून सिंधुदुर्गचा सहभाग करून घेतला. एअर अलायन्स या कंपनीने विमान वाहतूक सुरू केली. परंतु सध्याच्या सिंधुदुर्गातील राज्यकर्त्यांना त्याचे काहीही पडलेले नाही. केंद्र सरकारकडे ज्या पद्धतीने पाठपुरावा केला पाहिजे त्याचे त्यांना काहीही पडलेले नाही. आता त्यांचे काम झालेले आहे, जिल्हा वाऱ्यावर पडला तरी चालेल. परंतु, मी माझे प्रयत्न चालू ठेवलेले आहेत. चिपी विमानतळ बंद पडण्याची ज्यावेळी पहिली नोटीस आली त्यावेळी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र लिहिणारा विनायक राऊतच आहे, बाकी कुणी नाही. 


ON मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेब कबरीबाबत केलेल्या वक्तव्यावर

- छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कर्तुत्व आहे ते महाराष्ट्रामध्ये अशा घटनांमुळे दिसून येते. आम्हाला अभिमान आहे की, छत्रपती शिवरायांनी बलाढ्य अशा औरंगजेबाचा निःपात छत्रपती शिवाजी महाराजांनी जो केला आहे. त्याचे जे अवशेष आहेत ते पाहायला मिळतात. इतिहासाची साक्ष देणारी ती घटना आहे. त्यामुळे ती उखडून टाकण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व असा फलक लावून लोकांना त्याचे दर्शन देणे आवश्यक आहे. 


ON राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रात मराठीला विरोध झाल्यास... या वक्तव्यावर

- याला आता खूप उशीर झालेला आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा याविषयी आक्रमक होऊन काम करीत आहोत. परंतु, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे पहिल्या शिवसेनेच्या माध्यमातून जी स्थानीय लोकाधिकार समिती तयार झाली त्या समितीनेच सर्व कार्यालयांमध्ये मराठीचा भरणा केला आहे. म्हणून आज जरी राज ठाकरे मनसैनिकांना आवाहन करीत असले तरी ती वेळ निघून गेलेली आहे. पुढचे पाऊल अधिक आक्रमकपणे उचलण्याची गरज आहे. 


ON निवृत्त आयएनएस गुलदार युद्धनौका

- ही युद्धनौका निवती बंदरामध्येच स्थापित होणे गरजेचे आहे. कारण तेथील लोकांची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. कुणकेश्वरमध्ये या सत्ताधाऱ्यांना सत्तेचा वापर करून अजून काहीतरी वेगळे करू शकतात. विजयदुर्ग किल्ल्याला अधिक काहीतरी चांगले देऊ शकतात. त्यामुळे निवती येथील युद्धनौका कुणकेश्वरला हलविणे हे  पर्यटकावर अन्याय करणारे ठरेल. 


ON प्रवीण दरेकर आणि राज ठाकरे यांच्या लाडकी बहिण योजनेवरील वक्तव्यावर

- आता सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे काम संपलेले आहे. गरज सरो वैद्य मरो याप्रमाणे आता २१०० रुपये सोडाच कधीच मिळू शकणार नाहीत. कारण अजित पवारांसारखा खडूस हेडमास्तर अर्थ खात्याला भेटला आहे. आणि त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्याची लावलेली विल्हेवाट ही सांभाळायची असेल तर अजित पवार या अशा फुकट योजनांना फार पुढे प्रोत्साहन देतील, असे वाटत नाही. भगिनींची निराशा मात्र १०० टक्के होईल, असे हे सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या बोलण्यावरून वाटते. 


ON दीपक केसरकर शिंदे सेना नाराजी

- दीपक केसरकर हे नेहमीच अतृप्त आत्मा आहे. राजकीय स्वार्थ, सत्तेची खुर्ची जिथे मिळेल तिथे जायचे. मिळाली नाही की अज्ञातवासात जायचे, असा त्यांचा प्रघात आहे. यावेळी सुद्धा तसेच आहे.


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली