LOKSANDESH NEWS
PUNE | राजीव गांधी प्राणी संग्रहालयात प्राण्यांना उन्हापासून बचावासाठी कुलर आणि फवारे
ANC - राज्यात उष्णतेचा पारा वाढत असून या उष्णतामुळे नागरिक त्रस्त होत आहे. केवळ माणसच नाही तर प्राण्यांना देखील याच्या झळा या बसत आहेत.हीच बाब लक्षात घेत कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्राण्यासाठी विविध उपाययोजना या राबवण्यात येत आहेत. जानकी आणि मीरा या दोन हत्तीं साठी खास स्नानासाठी जलतरण तलाव तयार करण्यात आले असून त्यामध्ये सोडण्यात येत आहे तिथे त्यांच्यावर पाण्याचे फवारे देखील केले जातात.तसेच वाघ आणि सिहं यांच्यासाठी फॉगर सिस्टीम तसेच कुलर लावले आहेत.यामुळे प्राण्याची उष्णता कमी करण्यासाठी मदत होत आहे.
कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आता उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे.प्राणी संग्रालयात जवळपास 400 प्राणी आहेत. या सर्व प्राण्यांचं उन्हापाहून संरक्षण व्हावं यासाठी कुलर, वॉटर फोगर्स, पाण्याचे हौद अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
वाघ, हत्ती, अस्वल, साप या प्राण्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. उन्हामुळे त्यांच्या आहारात देखील बदल करण्यात आले आहेत. या सर्व प्राण्यांचं प्रत्येक उन्हाळ्यात जशी काळजी घेतली जाते, तशी यावर्षी घेतली जात आहे. हत्तीला अंघोळ घातली जाते. वाघांच्या पिंजऱ्यात फोगर्स सोडले जातात.