मा.रामदासजी आठवले साहेब. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री. मा.शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य.
मा.जिल्हाधिकारी ,
सांगली जिल्हा.
आपल्या सांगली जिल्ह्यातील एक ऐतिहासिक वास्तू म्हणून मिरज वानलेंस रुग्णालय याला पाहण्यात येते. परंतु या रुग्णालयाचे भवितव्य काळोख्यात गेलेले दिसत आहे.हे बाहेर काढण्याचे काम देखील एका संस्थेने करार पद्धतीने प्रयत्न चालू केले आहे, तरी देखील दोन आठवड्यापासून या रुग्णालयातील परिचारिका व फिजीओ थोर पी महाविद्यालय चालवण्यात येते तसेच या ठिकाणी वस्तीग्रह देखील मुलांसाठी आहे. या ठिकाणी वीज पुरवठा खंडित करणे म्हणजे शिक्षणावर गदा आणणे असा अर्थ होत आहे. काही थकबाकीमुळे येथील पाणीपुरवठा व वीज यंत्रणा खंडित करण्यात आले आहे .शासकीय दृष्ट्या चुकीच्या आहे. मुलांचे नुकसान करणे असा कायदा कोणताही सांगत नाही आणि शिक्षणापासून मुलांना वंचित करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे घटनेनुसार या मुलांना देखील शैक्षणिक सुरक्षा मिळणे गरजेचे आहे. म्हणून प्रशासनाला विनंती आहे की आर्थिक अडचणीमुळे बंद पडलेल्या रुग्णालयाचे अवस्था पाहून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येऊ नये. त्यांना शिक्षणासाठी लागणारी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी व सध्या वीज पुरवठा व पाणी त्वरित चालू करून देण्यात यावे.या रुग्णालयाला वाचवण्यासाठी शासनाने देखील प्रयत्न करावा असे आमचे मत आहे कारण देशात या महाविद्यालयाचा व रुग्णालयाचा इतिहास आहे याची जाणीव शासनाने घ्यावी.अन्यथा संघटनेच्या वतीने मुलांच्या शिक्षणासाठी रस्त्यावर उतरण्यात येईल.शासन मुलांसाठी आहे व जनतेचे कल्याण करणे हे शासनाचे पहिले कर्तव्य आहे. याचा विचार आपण करावा.
आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन व डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय मंच तसेच अमन समाज पार्टी
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष- मा. मिलिंद विष्णू साबळे. महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष- सुनील साबळे.
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष - चंद्रकांत पाटसुते. महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष- समाधान लोंढे.
सांगली जिल्हा प्रभारी- समाधान मोहिते,सांगली जिल्हा अध्यक्ष- रतन तोडकर, सांगली जिल्हा महिला अध्यक्ष- सौ कांबळे मॅडम व सांगली जिल्हा संघटक- उत्तम पाटणे.