LOKSANDESH NEWS
नववर्षाच्या स्वागतासाठी विविध उपक्रमांचे आयोजन, श्रीराम मंदिर देवस्थान समितीचा उपक्रम
नववर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
श्रीराम मंदिर देवस्थान व श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने हे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये सकाळी पाडवा पहाट तसेच स्कूटर रॅली श्रीराम प्रभात फेरी श्रीराम मंदिरात नवरात्र उत्सव शोभायात्रा महाप्रसाद असे विविध कार्यक्रम घेण्यात आले आहे.
पाडवा पहाट या कार्यक्रमाला गायक मंगेश बोरगावकर तसेच श्रावणी वागळे यांची उपस्थिती असणार आहे. शोभा यात्रेमध्ये बँड दिंड्या झाकी श्रीराम ढोल ताशा पथक असणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून श्रीराम मंदिर देवस्थान तसेच श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली