LOKSANDESH NEWS
ग्राहकांना न विचारता वीज मीटर बदलण्यात येत असल्याने मनसेचे आंदोलन
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एमएसइबी च्या मेन ऑफिस मधून ग्राहकांना न विचारता त्यांची वीज मिटर बदलत आहेत. हे मिटर बदलण्याचे काम करणाऱ्या व्यक्तींकडे ओळखपत्र नाही. शिवाय 15000 रु ची मागणी केली जात आहे.
पण अशा प्रकारचे कोणतेही पत्रक त्यांनी दाखवलेले नाही.
म्हणून या संदर्भात जाब विचारण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेततृत्वाखाली ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे व तक्रार दार मंदार भट यांनी महावितरणचे वरिष्ठ अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम यांची भेट घेतली व सदर विषयात लक्ष घालावे व येणाऱ्या कर्मचारी हे ओळखपत्रासह असावेत तसेच ग्राहकांना न विचारता अशा प्रकारे लाईट मिटर बदलू नयेत अशा सूचना देण्यात याव्यात अन्यथा मनसे त्यांना जाब विचारेल असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली