LOKSANDESH NEWS
पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय करून वन्यजीव सोयरेंनी केली होळी साजरी
बुलढाणा येथील वन्यजीव सोयरे यांनी ज्ञानगंगा अभयारण्यात जाऊन 6 ठिकाणी वनातील पक्षांचा विचार करून पाणी मातीचे 30 पॉट लावले आहे. होळी पासून उन्हाळ्याची सुरुवात होत असते.
याचा विचार करून उन्हाळ्यात वनातील पक्षांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत म्हणून अनोख्या पध्दतीने होळी हा सण साजरा करण्यात आला आहे.
2016 पासून वन्यजीव सोयरे हे बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात जाऊन पक्षांसाठी मातीचे भांडे लावून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत असतात.
बुलढाणाकरांनी तसेच ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या येणाऱ्यानी बुलढाणा येथून खामगावला जाताना जेथे आपल्याला पाण्याचे पॉट दिसतील त्या पॉटमध्ये पक्षांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी पाणी टाकावे असे आवाहन वन्यजीवसोयरे यांनी केले आहे.