LOKSANDESH NEWS
दुचाकी चोर पोलिसांच्या ताब्यात, आरोपीकडून १५ दुचाकी जप्त
नशेच्या आहारी गेलेल्या मोहम्मद हामीद अहेमद या सराईत चोरट्याला अखेर सिडको पोलिसांनी गजाआड करत त्याच्याकडून ९ लाख ८० हजार रुपये किमतीच्या चोरीच्या तब्बल १५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सिडको पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सिडको पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांनी यांनी स्वतः तपासची चक्र फिरवत त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळवली व विशेष पथकासह सनी सेंन्टर पिसादेवी रोड येथे सापळा लावला. मिळालेल्या माहिती प्रमाणे एक संशयित त्या ठिकाणी एक विना क्रमांकाची HF डिलक्स गाडी विक्री करिता घेवून आला. सिडकोचे अधिकारी व अंमलदार यांनी जागीच पकडून त्याची विचारपूस केली असता,
त्याने उडावाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्याच्या ताब्यातील मोटार सायकलसह पोलीस स्टेशन येथे आणून सखोल विचारपूस केली असता त्याने आपले नाव मोहम्मद हमीद असे सांगितले तर अधिक विचारपूस केली असता अशी माहिती मिळाली की, मोहम्मद हामीद अहेमद या तरुणाला कौटुंबिक वादातून नशेची सवय लागली तर नशेसाठी पैसे कमी पडत असल्याने याने चक्क दुचाकी चोरण्याचा निर्णय घेतला. तर मोहम्मदने एक दोन नाही तर चक्क १५ दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले आहे.