ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचा माल पडूनच, किरकोळ विक्रेत्यांनी बाजाराकडे फिरवली पाठ
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट मध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर राहिली. गुढीपाडव्याच्या सणामुळे घरोघरी पुरणपोळी तसेच श्रीखंड पुरीचे बेत होत असल्याने फळभाज्यांना उठाव कमी राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणलेला माल तसाच पडून राहिला, त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्याच्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळत आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या पालेभाज्यांमध्ये मोठी भर झाली आहे. हाच माल आता धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आला असून, हा माल घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी काहीसा कमी प्रतिसाद दिल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन काहीतरी प्रमाणात भरपाई द्यावी, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली