LOKSANDESH NEWS
प्रवासादरम्यान मेल एक्सप्रेस मध्ये चोरी; चोट्याला रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी केली अटक
रेल्वे प्रवासादरम्यान मेल एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवाशांच्या महागड्या वस्तू चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केली आहे.
त्याच्याकडून चोरलेले जवळपास पाच लाखांचे मोबाईल, आयपॅड, दागिने आणि इतर वस्तू हस्तगत करण्यात आले आहे.
सहिमत शेख असे या चोरट्याचे नाव असून, तो नवी मुंबईचा राहणारा आहे. त्याच्याकडून आतापर्यंत सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास रेल्वे क्राईम ब्रँच पोलीस करीत आहेत.