LOKSANDESH NEWS
गोंदिया शहरातील प्रवेश चौकात अपघाताला बसणार आळा, वाहतूक पोलिसांच्या पुढाकाराने लावण्यात आले ट्रॅफिक सिग्नल
- गोंदिया शहरातील मुख्य प्रवेश चौक कुडवा नाका येथे अनेक अपघात होत असल्याने मागील अनेक दिवसांपासून या परिसरातील लोकांची या चौकात ट्रॅफिक सिग्नल लावण्याची मागणी होती.
या मागणीला दुजोरा देत जिल्हा वाहतूक पोलिस विभागाने पुढाकार घेत या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल लावण्यात यश आले व या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल सुरू झाले.
आता या ठिकाणी होणाऱ्या अपघातांवर आळा बसणार तर या कुडवा चौकात ट्रॅफिक सिग्नल लागल्याने नागरिकांनी सुद्धा वाहतूक पोलिसांचे आभार मानले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली