ऑटोमध्ये ऑक्सिजन सिलेंडर टाकत असताना स्फोट, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील घटना

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

ऑटोमध्ये ऑक्सिजन सिलेंडर टाकत असताना स्फोट, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील घटना

LOKSANDESH NEWS 

ऑटोमध्ये ऑक्सिजन सिलेंडर टाकत असताना स्फोट, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील घटना 

 बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात लक्ष्मीनगर येथे आज रविवारी दुपारी ऑटोमध्ये ऑक्सीजन सिलेंडर टाकत असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटात एक जण ठार झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ऑटोमध्ये सिलेंडर ठेवत असताना गॅस गळतीमुळे किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे हा स्फोट झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

 घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना मदत केली. 

त्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली