LOKSANDESH NEWS
मुंबई-आग्रा महामार्गावर मन्नत पार्क परिसरात प्लास्टिक दाना बनवणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग
धुळे शहरातील मुंबई-आग्रा महामार्गाजवळील वडजाई रोडवरील हॉटेल मुल्लाच्या ढाबा व मन्नत पार्क परिसरात, एका प्लास्टिक दाना बनवणाऱ्या फॅक्टरीला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे.
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. प्लास्टिकची फॅक्टरी असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल असून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत
. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.