YAVATMAL
केवळ 'सर' न म्हटल्याने कुरिअर बॉयला मारहाण केल्याचा आर्णी ठाणेदारांचा व्हिडीओ व्हायरल
ANC - मोबाइलवरून संभाषण करतांना केवळ 'सर' न म्हटल्याच्या कारणावरून एका डिलेव्हरी बॉयला शिव्यांची लाखोळी वाहण्यात आली. एवढेच नव्हेतर दमदाटी करीत त्याचा पत्ता विचारण्यात आला. शिवाय तो कार्यरत असलेल्या प्रतिष्ठानात जात त्या डिलेव्हरी बॉयला बेदम मारहाण करण्यात आली. आर्णी ठाणेदार केशव ठाकरे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
धिरज गेडाम रा. आर्णी असे मारहाण झालेल्या डिलेव्हरी बॉयचे नाव आहे. तो कुरीअर आणि पार्सल पोहोचविण्याचे काम करतो. एका कुरीअरवर केशव ठाकरे असे नाव आणि मोबाइल क्रमांक नमूद होता. तेंव्हा त्या मोबाइलवर कॉल करीत धिरज याने केशव ठाकरे बोलता का,
अशी विचारणा केली. तेव्हा ठाणेदार केशव ठाकरे यांचा पारा चांगलाच चढला. त्यामुळे पुढील प्रकार घडला.