LOKSANDESH NEWS
आन्वा येथे तरुणावर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे निदर्शने
जालना जिल्ह्यात अलीकडे मागासवर्गीय भटक्या तसेच ओबीसी समाजावर अत्याचार वाढले आहेत. सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, कायदा हातात घेणाऱ्यांना कायद्याचे भय उरलेले नाही, पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारावर वचकच राहिलेला नाही.
जिल्ह्यात असुरक्षित असे वातावरण निर्माण झाले आहे. भोकरदन तालुक्यातील अमानुष अत्याचार प्रकरणी कठोर कारवाई व्हावी, यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज क्रांती चौकामध्ये निदर्शने केली.
आन्वा येथील कैलास बोराडे या मेंढपाळ समाजाच्या तरुणास महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव मंदिरात गेल्याच्या कारणावरून लोखंडी सळई गरम करून त्याच्या शरीरावर चटके दिले तसेच क्रुरपणे छळ करून मारहाण करण्यात आली.
ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून, निंदनीय आहे. अत्याचाराच्या घटना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेने महाराष्ट्र संपूर्ण हादरुन गेला आहे. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांती चौक येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.